+918048033429
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
गोष्ट पृथ्वीमोलाची...भाग २ Couple counselling चं सेशन सुरू होतं..... हो..हे थोडं अवघड असतं हां....दोघांची आपापली बाजू असते...खरी असणारी अजून एक तिसरी बाजू असते....दोघांना नातं टिकवायचंही असतं पण अपमानाचे सलही असतात, भांडणाची थोडीबहुत खुमखुमी असते... counselling room कोणत्याही क्षणी द्वंद्वाचा आखाडा, क्रोधागार किंवा शोकागार यांत convert होऊ शकते, अशी परिस्थिती....! बरं... नातं दोघांचं असतं....त्यातले अनेक नाजूक क्षण दोघांनी अनुभवलेले असतात... प्रचंड मोठी भावनिक गुंतवणूक असते... कुटुंबाच्या सहभागाचे अनेक पदर असतात, एकमेकांच्या साथीने रंगवलेली स्वप्नं असतात... आणि हे सगळं अनुभवणारी फक्त आणि फक्त ती दोघं असतात...तिसऱ्या माणसाने खरं तर मध्ये पडू नये....ती दोघं एकमेकांना ओळखत असतात पण काही वेळा आपल्या नात्याला काय हवंय ते त्यांना स्पष्ट करून देण्यासाठी तिसरी व्यक्ती गरजेची ठरते. तर...असंच एक सेशन सुरू होतं.... उच्चशिक्षित, उत्तम करीअर असणारे ते दोघे....लग्नानंतरच्या ३-४ वर्षात नातं एका वेगळ्या वळणावर आलं होतं. म्हणजे परस्परांपासून विभक्त होण्याइतका मोठा विषयही नाही पण सगळं आलबेल आहे, असंही नाही. नक्की काय problem आहे, हे discussion सुरू होतं.... कामाच्या वेळा, भिन्न आवडी-निवडी, कोणत्या समारंभात कसा अपमान झाला या वरवर बघता मोठ्या वाटणा-या समस्यांवर बोलून झालं. आता मुख्य मुद्द्याला हात घालण्याची गरज होती. दोघांना नात्याकडून असलेल्या बेसिक अपेक्षा विचारल्या. नशिबाने दोघांच्या नात्याकडून असलेल्या अपेक्षा ब-यापैकी सारख्या होत्या. त्यात परस्परांबद्दल आदर असावा, चारचौघात एकमेकांचा मान राखला जावा आणि जोडीदाराने एकनिष्ठ असावे... या अपेक्षा होत्या. परस्परांच्या दुख-या बाजूंचे भान असावे...ही पण एक छोटीशी अपेक्षा होती. या अपेक्षा जोडीदाराच्याही असणं दोघांनाही मान्य होतं...सुदैवाने या जोडप्याच्या बाबतीत हा टप्पा वैचारिक पातळीवर क्लिअर होता. पण सगळं प्रत्यक्षात आणायचं कसं?... असा प्रश्न होता... अगदी साधं उदाहरण म्हणजे, भांडणाची वेळ आली दोघे एकमेकांच्या दुख-या बाजू उकरून काढत. बरेचदा भांडणाच्या मुद्द्याशी त्याचा काहीही संबंध नसायचा पण आगीत तेल ओतलं जायचं. त्यामुळे शब्दाला शब्द लागून भरकटलेलं भांडण दोघांना जखमी करून सोडायचं. मग दोघं जखमी पक्ष आपापल्या जखमा कुरवाळत आणि पुढल्या भांडणसाठी बेगमी करत बसायचे. या गदारोळात नात्याच्या तुलनेने कमी महत्वाच्या असलेल्या मानापमानाच्या गोष्टीही आभाळाएवढ्या मोठ्या भासायच्या…. आणि पुढल्या भांडणासाठी आणिक खुमासदार मुद्दे सुचायचे. या कारणमिमांसेची चर्चा झाल्यावर दोघे जरा विचारात पडले. पुढल्या सेशनला आले तेव्हा मुद्दा नक्की पटलेला होता पण तरी प्रत्यक्षात कसा आणायचा ते समजत नव्हतं. दोन महत्वाचे नियम दोघांना सांगितले. पहिला म्हणजे ...दररोजचे व्यवहार, वाद-विवाद आणि त्याच्या प्रतिक्रिया यात दोघेही थोड्या-बहुत प्रमाणात दुखावले जात असतात. या दुखावल्या जाण्याचं काही परिमाण असत नाही. कोण किती प्रमाणात दुखावलं गेलं, हे मोजता येत नाही. त्यामुळे "दुखावलं जाणं" हा पुढल्या भांडणाची स्टार्ट लाइन ठरू नये, याची काळजी घ्यायची. जी गोष्ट खटकली असेल, ती जोडीदाराला सौम्य शब्दात सांगायची. अर्थात "तू असं वागलेलं, बोललेलं मला फारसं रूचलं नाही... यापेक्षा तू तसं वागलेलं मला आवडलं असतं" दुस-याने बोलणं पूर्ण ऐकून घ्यायचं आणि मगच त्यावर आपलं मत व्यक्त करायचं. तरीही भांडण झालंच तर मुख्य मुद्दा सोडून इतर विषय काढायचे नाहीत. असं भांडण एकदा संपलं की मग पुन्हा तो विषय विनाकारण काढायचा नाही. या सगळ्यात कोणत्याही क्षणी आपला संयम सुटतोय, शब्दांची निवड चुकतेय असं वाटलं तर २४ तासांचा वेळ स्वत:साठी घ्यायचा. थांबायचं. जनरली दिवसभरात अनावश्यक भावना निवळतात आणि आवश्यक तेवढंच पोहोचवलं जातं. या साध्या उपायांनी त्यांचे बरेचसे वाद निवळले. परस्परांच्या आवडी-निवडी, स्वभावाचे ताणे-बाणे नव्याने समजले. अजूनही किरकोळ वाद होतात पण मार्ग काढायला दोघेही आता शिकलेत. नात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि व्यक्तीकडून असलेल्या अपेक्षा याचा सुवर्णमध्य काढणं, हा सुद्धा या परिस्थितीत चांगला मार्ग असू शकतो पण त्याबद्दल परत कधीतरी....