+918048033429
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
आयुर्वेदिक doctor आणि समुपदेशक (Counselor)असल्याने मला नेहमी प्रश्न विचारला जातो... "तुमच्या आयुर्वेदात मनाबद्दल काही सांगितलं आहे का?" खरं सांगायचं तर आयुर्वेदात शरीर आणि मनाच्या आरोग्याबद्दल, रोगांबद्दल बरच काही सांगितलं आहे. आयुर्वेदातली प्रकृती ही संकल्पनेची तोंडओळख सगळ्यांना आहेच. वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार असणारे स्वभावाचे असणारे वेगवेगळे पैलू सांगितलेले आहेत. मनाचं बेसिक काम म्हणजे जे जे समजून घ्यायचं आहे, ते समजण्यासाठी मदत करणे. म्हणजे डोळ्यांना जे दिसते, ते समजून घेण्यासाठी मनाचे साहचर्य हवे. आपला नेहमीचा अनुभव असतो... मन था-यावर नसेल तर स्पष्ट समोर असणारी वस्तूसुद्धा नजरेतून सुटते. लक्ष नसेल अर्थात् मनाचे साहचर्य नसेल तर हाक मारलेली ऐकू येत नाही. थोडक्यात ऐकता येणारा, बघता येणारा, वाचता येणारा कोणताही विषय समजायचा असेल तर चित्त ठिकाणावर हवेच हवे. एखाद्या गोष्टीची इच्छा होणे, स्नेह वाटणे, लोभ वाटणे, राग येणे, द्वेष वाटणे, मत्सर वाटणे या सगळ्या भावना तुमच्या-आमच्या सगळ्यांच्या मनात थैमान घालत असतात. या सगळ्या भावनांचा अनेक ठिकाणी उल्लेख आयुर्वेदाच्या ग्रंथात सापडतो. शोक, क्रोध, भय, असूया हे सगळे भाव वेगवेगळे रोग होण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. मनावर आघात होणे हेसुद्धा मानसिक रोगांचे महत्वाचे कारण सांगितले आहे. मनावर आघात होण्याची कारणेदेखील कमी शब्दात आणि चपखल सांगितली आहेत. आपल्याला जे हवे आहे, ते प्राप्त न होणे आणि जे प्राप्त झाले आहे ते नको असणे ही दोनच मनावर आघात होण्याची कारणे आहेत. या दोनच कारणांच्या परिघात जवळच्या व्यक्तीचा मृत्यु, मोठे आर्थिक नुकसान, प्रेमभंग, परीक्षेतील-कार्यक्षेत्रातील अपयश अशी अनेक मनोआघाताची कारणे समाविष्ट होतात. मनावर आघात होण्यासाठी दर वेळी प्रचंड मोठे कारण हवे असे नाही. दररोजच्या जगण्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टीसुद्धा कारणीभूत होतात. व.पु. काळे म्हणतात तसं .. "छोटे-छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतो. ते एकट्याने सोसायचे. माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो." या छोट्या-मोठ्या आघातांनी मोठा रोग होत नाही...पण मानसिक शक्ती कमी होण्याची शक्यता जरूर वाढते. मनात उत्पन्न होणा-या परस्परविरोधी भावनांचेदेखील आयुर्वेदात वर्णन आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर काम आणि क्रोध (राग येणे) हे परस्परविरोधी भाव आहेत. काम याचा अर्थ कोणतीही कामना/ इच्छा असणे. इच्छा ही एखाद्या वस्तूची, व्यक्तीची, परिस्थितीची असू शकते. यातली कोणत्याही प्रकारच्या इच्छेची पूर्तता न झाल्याने येतो तो क्रोध होय. अशा भाव-भावनांच्या वादळामुळे निर्माण होणारे अनेक लहान-मोठे रोग आणि त्यांच्यासाठीच्या औषधोपचारांचे वर्णन आयुर्वेदात आहे. आणि अर्थातच या सगळ्यातील श्रेष्ठ औषध "धी-धैर्यात्मादिविज्ञानम् ।" हे सांगितले आहे. याचा अर्थ आपल्या आजूबाजूची परिस्थिती, त्यातील आपली भूमिका याचे योग्य आकलन होणे आणि धीराने गोष्टी स्वीकारणे हे आहे. या सगळ्या पाय-या समुपदेशन करताना अर्थातच येतात. सध्या प्रचलित असणा-या वेगवेगळ्या सायकोथेरपीज् म्हणजे मला "धी-धैर्यात्मादिविज्ञानम्...." चे वेगवेगळे टप्पे वाटतात. याबरोबर मानसिक रोगांचे उपचार करण्यासाठी वेगवेगळी औषधं, औषधी तूपं सांगितली आहेत. वमन, विरेचन, नस्य, शिरोधारा, शिरोपिचु हे उपक्रम (पंचकर्म व इतर प्रक्रिया) केल्याने चांगला फायदा होतो. #AyurvedicDoctorInKokaneChowk