+918048033429
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
Emotional Audit सूडाने पेटलेलं एक वादळ माझ्यासमोर counsellingसाठी बसलं होतं. 10-12 वर्षांपूर्वी एका Bussiness partner शी खटके उडाले... आणि भागीदारी थांबवावी लागली. हा निर्णय घेताना खरं तर फार आर्थिक नुकसान झालं नव्हतं. मानसिक अस्वस्थता मात्र जबरदस्त होती. या एका घटनेने या माणसाने पार आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून घेतला होता. त्यानंतर बाकी business partnersशी वागताना एक भीती मनात होती. बारीक-सारीक मतभिन्नता खुल्या दिलाने स्विकारण्याऐवजी त्यात कारस्थानांची बीजं आहेत का...याची कसून तपासणी केली जात होती. अर्थातच या सगळ्यात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य पणाला लागलं होतं.बरं हे सगळं कमी की काय... म्हणून 10 वर्षांपूर्वी सोडून गेलेल्या business partnerला त्यांच्या सध्याच्या आयुष्यात अडचणी येतील, अशी व्यवस्था केली जात होती. ………आणि हे महाशय "मानसिक स्वास्थ्यच नाही हो" अशी तक्रार घेऊन आले होते. कसं बरं मिळणार मानसिक स्वास्थ्य??? आपण सूड घेण्याच्या भावनेने त्रस्त आहोत, हेच मूळी त्यांना पटत नव्हतं. "मी त्याला धडा शिकवलाच पाहिजे" या मतावर ठाम होते. हळूहळू हळूहळू त्यांच्या भावनेची वावटळं खाली बसली. मग त्यांच्या बेसिक प्रॉब्लेम पासून सुरुवात केली. ज्या गोष्टीवरून खटके उडाले होते, त्याबद्दल बोलताना या महाशयांना स्वतःलाच अनेक चांगले मार्ग सुचले. " मी वागलो त्यापेक्षा अजून बरेच वेगळे चांगले मार्ग होते. त्या-त्या वेळी मी चुकीच्या पद्धतीने वागत गेलो." त्यांनी कबूली दिली. पुढल्या सेशनला चुकीचा mindset मनात धरून आपण काय काय चुका करून बसलो याची उजळणी झाली. त्यात झालेलं व्यवसायिक नुकसान, तुटलेली माणसं आणि तब्येतीचं झालेलं नुकसान याचा लेखाजोखा त्यांनीच मांडला. १० वर्षांत घालवलेली मन:शांती आणि वरवर सगळं छान चाललंय हे दाखवण्यासाठीची कसरत... असं दुहेरी दुखणं. अनेक सेशन्सनंतर गाडी रूळावर आली. सूडाची, भीतीची भावना निवळली. आता पश्चात्ताप आहे. त्याची तीव्रता पण हळूहळू कमी होतेय. एखाद्या नकारात्मक भावनेला चिकटून राहिलं तर किती मोठं नुकसान होऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण असलेली ही केस. असं कधी-कधी आपलं सगळ्यांचंच होतं. दर थोड्या दिवसांनी आपलं आपण emotional audit करावं. आजूबाजूच्या परिस्थितीत प्रतिक्रिया स्वरूप निर्माण होणा-या तात्कालिक भावना आपलं आयुष्य किती प्रमाणात बदलवता आहेत, याचा आढावा घ्यावा. गरजेनुसार विचारांत बदल करावा, प्रगल्भता आणण्याचा प्रयत्न असावा. माणसांचं माणूसपण नक्कीच भावनाप्रधान असण्यात दडलंय....पण त्याला मर्यादा असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हो ना...? AyurvedicClinicNearKokaneChowk